ssc hsc board examtime table update 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.
परीक्षा सुरू होण्याच्या तारखा
- इयत्ता 12वी लेखी परीक्षा : 10 फेब्रुवारी 2026 पासून
- इयत्ता 10वी लेखी परीक्षा : 20 फेब्रुवारी 2026 पासून
या परीक्षा राज्यातील
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण
या ९ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत.
लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक (Practical), मौखिक (Oral) आणि अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) परीक्षा घेण्यात येणार असून, त्यांचे स्वतंत्र वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
मंडळाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे की, अधिकृत वेबसाइटवरील वेळापत्रक तपासूनच तयारी करावी. वेळापत्रकात काही बदल झाल्यास त्याची माहिती संकेतस्थळावर तसेच शाळांमार्फत दिली जाईल.
🔔 महत्त्वाची नोंद:
मागील वर्षी 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, मात्र यावर्षी परीक्षा एक दिवस आधी म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे.
इयत्ता 10वी (SSC) लेखी परीक्षा वेळापत्रक 2026
(सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 / विषयानुसार वेळ)
| दिनांक | वार | वेळ | विषय |
|---|---|---|---|
| 20 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार | सकाळी 11 ते दुपारी 2.00 | मराठी (कुमारभारती) |
| 23 फेब्रुवारी 2026 | सोमवार | सकाळी 11 ते दुपारी 2.00 | मराठी (अक्षरभारती) |
| 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार | सकाळी 11 ते दुपारी 2.00 | संस्कृत |
| 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार | दुपारी 3.00 ते सायं. 5.00 | संस्कृत (संयुक्त) |
| 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार | सकाळी 11 ते दुपारी 2.00 | इंग्रजी |
| 4 मार्च 2026 | बुधवार | सकाळी 11 ते दुपारी 2.00 | हिंदी (100 गुण) |
| 6 मार्च 2026 | शुक्रवार | सकाळी 11 ते दुपारी 1.00 | गणित – भाग 1 |
| 9 मार्च 2026 | सोमवार | सकाळी 11 ते दुपारी 1.00 | गणित – भाग 2 |
| 11 मार्च 2026 | बुधवार | सकाळी 11 ते दुपारी 1.00 | विज्ञान – भाग 1 |
| 13 मार्च 2026 | शुक्रवार | सकाळी 11 ते दुपारी 1.00 | विज्ञान – भाग 2 / इतिहास-राज्यशास्त्र |
| 18 मार्च 2026 | बुधवार | सकाळी 11 ते दुपारी 1.00 | भूगोल |
10वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
12वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
