PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना लॉटरी! खात्यात येणार 4,000 रुपये मिळणार

PM Kisan Yojana 22th Installment Farmer ID 2026 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 21व्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर आता देशभरातील शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या योजनेबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, पुढील हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ई-केवायसी आणि फार्मर आयडी सक्तीचा

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे. याशिवाय, आता Farmer ID (फार्मर आयडी) सुद्धा आवश्यक करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे दोन्ही टप्पे पूर्ण केलेले नाहीत, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो.

फार्मर आयडी म्हणजे काय?

फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा डिजिटल ओळख क्रमांक असून, तो AgriStack प्रणाली अंतर्गत तयार केला जातो. या आयडीच्या माध्यमातून शासनाला खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची अचूक माहिती मिळते आणि बोगस लाभार्थ्यांवर आळा बसतो.

फार्मर आयडी कसा तयार करावा?

शेतकरी AgriStack Portal ला भेट देऊन फार्मर आयडी तयार करू शकतात. यासाठी –

  • प्रथम युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल
  • आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल
  • OTP सबमिट केल्यानंतर फार्मर आयडी तयार होईल

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ई-केवायसी सुद्धा करणे आवश्यक आहे.

2026 च्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमध्ये पीएम किसान योजनेतील आर्थिक मदत वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये (2,000 रुपयांचे तीन हप्ते) दिले जातात. मात्र, ही रक्कम वाढवून वार्षिक 12,000 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे.

जर हा निर्णय लागू झाला, तर 22व्या हप्त्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 ऐवजी 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

22व्या हप्त्याची तारीख काय?

पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ?

ही योजना अल्पभूधारक आणि पात्र शेतकऱ्यांसाठी आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने रक्कम जमा केली जाते.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

  • ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा
  • फार्मर आयडी तयार करून घ्या
  • आधार, बँक खाते व जमिनीची माहिती अद्ययावत ठेवा

हे सर्व टप्पे पूर्ण केल्यासच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वेळेवर मिळू शकतो.

Leave a Comment