8th Pay Commission Implementation Date 2026: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. दरम्यान, आता याबाबत सरकारने माहिती दिली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता आणि डीआर वाढणार जानेवारीपासूचा डीए लवकरच मिळणार
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष खूप चांगले असणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, त्याआधीच आता महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईची नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे यावेळी पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. याचसोबत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत हालचालींना वेग मिळाला आहे.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
संसदेत आठव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली होती. आठव्या वेतन आयोगाची तारीख अजूनपर्यंत निश्चित नाहीये. ३ नोव्हेंबर रोजी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी करण्यात आले आहे. याचा रिपोर्ट १८ महिन्यात दिला जाणार आहे. त्यानंतर वेतन आयोग लागू होईल.
महगाई भत्ता आणि बेसिक सॅलरी एकत्र करण्याचा प्लान
गेल्या अनेक दिवसांपासून बेसिक सॅलरीत महागाई भत्ता आणि DR जोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, सध्या तरी याबाबत कोणताही प्रस्ताव नाही असं सांगण्यात आले आहे. मंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, DA आणि DR दर सहा महिन्यांनी वाढवला जातो. हा AICPI-IW इंडेक्सवर आधारिक असतो. सध्या डीए आणि डीआर हा ५५ टक्के आहे.
वेतन आयोग उशिराने लागू होण्याचे कारण
आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी २०२५ मध्ये झाली होती. दरम्यान, त्यानंतर ९ महिन्यांनी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले. यानंतर १८ महिन्यात रिपोर्ट दिला जाणार आहे. यानंतर नवीन सॅलरी स्ट्रक्चर तयार केले जाणार आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पगार वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळेच आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होणार आहे.