मोठी बातमी : जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात?

Zila parishad Panchayat Samiti Election News 2026 : पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होऊ शकते. आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची पुढील आठवड्यात घोषणा होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी झाल्याचे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

निवडणूक रखडलेल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या आहेत. यापैकी २० जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक आहे. तिथल्या निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत न घेण्याचे आदेश आहेत. त्यांचे भवितव्य २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवर अवलंबून आहे.

पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्हा परिषदा?

ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment