Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात, असा करा बॅलेन्स चेक

Ladki Bahin Yojana December 1500 Rupees Installment Recieved: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत असून, उद्यापर्यंत बहुतांश लाभार्थींना पैसे मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सरकारकडून मकरसंक्रांतीपूर्वी पैसे दिले जातील, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबरचा हप्ता वेळेत जमा झाला आहे. मात्र, सध्या फक्त एका महिन्याचाच हप्ता (₹१५००) जमा झाला असून, दोन महिन्यांचे एकत्र ₹३००० मिळणार असल्याची चर्चा पूर्ण झाली नाही.

₹३००० ऐवजी ₹१५००च का मिळाले?

डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली की आचारसंहितेच्या काळात एकत्रित स्वरूपात मोठी रक्कम देता येणार नाही. त्यामुळे सध्या लाभार्थी महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता देण्यात आला आहे.

यामुळे काही महिलांमध्ये नाराजी असली, तरी सरकारकडून पुढील हप्ता निवडणूक प्रक्रियेनंतर दिला जाण्याची शक्यता आहे.

पैसे खात्यात जमा झाले का? असे तपासा

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थी महिलांना बँकेकडून SMS द्वारे सूचना येते. याशिवाय खालील मार्गांनीही तुम्ही खात्री करू शकता :

  • मोबाईल बँकिंग / UPI अ‍ॅपमध्ये Transaction History तपासा
  • इंटरनेट बँकिंगद्वारे खाते तपासा
  • जवळच्या बँक शाखेत किंवा ATM मधून बॅलन्स चौकशी करा

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

सध्या तरी जानेवारी महिन्याच्या ₹१५०० हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढील हप्ता जमा केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Leave a Comment