दहावी–बारावी बोर्ड परीक्षा 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर | PDF आत्ताच डाउनलोड करा

ssc hsc board examtime table update 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.

परीक्षा सुरू होण्याच्या तारखा

  • इयत्ता 12वी लेखी परीक्षा : 10 फेब्रुवारी 2026 पासून
  • इयत्ता 10वी लेखी परीक्षा : 20 फेब्रुवारी 2026 पासून

या परीक्षा राज्यातील
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण
या ९ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत.

लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक (Practical), मौखिक (Oral) आणि अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) परीक्षा घेण्यात येणार असून, त्यांचे स्वतंत्र वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.

मंडळाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे की, अधिकृत वेबसाइटवरील वेळापत्रक तपासूनच तयारी करावी. वेळापत्रकात काही बदल झाल्यास त्याची माहिती संकेतस्थळावर तसेच शाळांमार्फत दिली जाईल.

🔔 महत्त्वाची नोंद:
मागील वर्षी 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, मात्र यावर्षी परीक्षा एक दिवस आधी म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे.

इयत्ता 10वी (SSC) लेखी परीक्षा वेळापत्रक 2026

(सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 / विषयानुसार वेळ)

दिनांकवारवेळविषय
20 फेब्रुवारी 2026शुक्रवारसकाळी 11 ते दुपारी 2.00मराठी (कुमारभारती)
23 फेब्रुवारी 2026सोमवारसकाळी 11 ते दुपारी 2.00मराठी (अक्षरभारती)
25 फेब्रुवारी 2026बुधवारसकाळी 11 ते दुपारी 2.00संस्कृत
26 फेब्रुवारी 2026गुरुवारदुपारी 3.00 ते सायं. 5.00संस्कृत (संयुक्त)
27 फेब्रुवारी 2026शुक्रवारसकाळी 11 ते दुपारी 2.00इंग्रजी
4 मार्च 2026बुधवारसकाळी 11 ते दुपारी 2.00हिंदी (100 गुण)
6 मार्च 2026शुक्रवारसकाळी 11 ते दुपारी 1.00गणित – भाग 1
9 मार्च 2026सोमवारसकाळी 11 ते दुपारी 1.00गणित – भाग 2
11 मार्च 2026बुधवारसकाळी 11 ते दुपारी 1.00विज्ञान – भाग 1
13 मार्च 2026शुक्रवारसकाळी 11 ते दुपारी 1.00विज्ञान – भाग 2 / इतिहास-राज्यशास्त्र
18 मार्च 2026बुधवारसकाळी 11 ते दुपारी 1.00भूगोल

10वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

12वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment